esakal | हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश; एजंटला गुजरातमध्ये जावून बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश; एजंटला गुजरातमध्ये जावून बेड्या

हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश; एजंटला गुजरातमध्ये जावून बेड्या

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यासह राज्यात हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेट चालविणाऱ्या तसेच मागील चार वर्षांपासून फरारी असलेल्या एका एजंटास खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. गुजरातमधील सुरत येथून आरोपीस पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा: "संजय राऊत रॉकस्टार"; उर्मिला मातोंडकर यांच्याकडून कौतूक

शिवा एजंट उर्फ शिवा रामकुमार चौधरी (वय 37, रा. नेपाळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शहरात सेक्‍स रॅकेट चालविल्याप्रकरणी संबंधित टोळीविरूद्ध 2017 मध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोका) नुसार कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून शिवा फरारी होता. मात्र, मागील 15 दिवसापूर्वी तो गुजरातमधील सुरत शहरात त्याच्या मित्राकडे आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विजय झंजाड यांना मिळाली.

हेही वाचा: पृथ्वीचे आरोग्य समुद्रावर कसे अवलंबून? जाणून घ्या नेमकं कारण

त्यानुसार पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शखाली खंडणी विरोधी पथक गुजरातमधील सुरत येथे गेले होते. तेथून सुरत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीने शिवा चौधरीला अटक केले. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस कर्मचारी प्रदीप शितोळे, प्रवीण पडवळ, बापू भोसले, विजय गुरव, संपत अवचरे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

loading image