

Delhi judicial officer Aman Kumar Sharma was found dead in his Green Park residence, with reports indicating ongoing domestic disputes prior to the incident.
esakal
दिल्लीतील एका न्यायाधीशाचा मृतदेह घरातील बाथरुम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मूळचे राजस्थानमधील अलवर येथील रहिवासी असलेले ३० वर्षीय अमन कुमार शर्मा दिल्लीच्या ईशान्य जिल्ह्यातील 'जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव म्हणून कार्यरत होते. ते दिल्लीतील 'ग्रीन पार्क' परिसरातील त्यांच्या राहत्या घरी पत्नीसह वास्तव्यास होते. या आत्महत्या प्रकरणाबाबत आता काही धक्कादायक तपशील समोर आले आहेत. न्यायाधीशांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन यांचा त्यांच्या पत्नीशी गेल्या काही काळापासून वाद सुरू होता.