Kanjhawala Case : मृत अंजलीवर दिल्लीमध्ये दाखल आहे गुन्हा; सहा महिन्यांपूर्वी रात्री तिने...

kanjhawala case
kanjhawala caseesakal

नवी दिल्लीः १ जानेवारी रोजी पहाटे दिल्लीच्या हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. त्यामुळे सबंध देश हळहळला असून या प्रकरणामध्ये सात आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्या दिवशी अंजलीचं निधी नावाच्या मैत्रिणीसोबत भांडण झालं होतं.

निधीवर ड्रग्ज प्रकरणात दिल्ली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला होता. आता अंजलीवरही एक गुन्हा दिल्लीमध्ये दाखल आहे, अशी माहिती आज पुढे आलेली आहे.

हेही वाचाः प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

सुल्तानपुरी घटनेतील आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. 'स्कूटीला धडक दिल्यानंतर तरुणी गाडीखाली अडकल्याचे त्यांना समजले. तिला बाहेर काढण्यासाठी आरोपींनी कार दोन वेळा पुढे-मागे नेली होती. त्यानंतरही तरुणी न निघाल्याने ते घाबरले आणि वेगाने गाडी चालवू लागले. अशी माहिती चौकशीदरम्यान आरोपिंनी दिली आहे.

kanjhawala case
OBC News : केवळ दोन महिन्यांमध्ये होईल ओबीसी जनगणना! कसं ते भूजबळांनीच सांगितलं

मृत अंजली हिच्यावर दिल्लीतल्या पंजाबी बाग पोलिस ठाण्यामध्ये बेजबाबदारपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल होता. सहा महिन्यांपूर्वी पंजाबी बागच्या क्लब रोडवर रस्त्यावर एक अपघात झाला होता. त्यामध्ये अंजली गंभीर जखमी झालेली होती. त्या घटनेचं फुटेजही समोर आलं आहे. त्यामध्ये ती भरधाव वेगात स्कुटी चालवत असल्याचं दिसत आहे.

त्याचवेळी अंजलीची स्कुटी रस्त्याच्या बाजूला असलेल्या टायरवरुन घसरली. डॉक्टरांनी मेडिकल रिपोर्टमध्ये तिच्या तोंडातून दारुचा वास येत असल्याचं लिहिलं होतं आणि तिला सफदरजंग रुग्णालयात रेफर केलं होतं. ही घटना रात्री दोन वाजता घडली होती.

घटनेच्या रात्री नेमकं काय झालं?

अंजलीच्या एका मित्राने सांगितलं की, त्या दिवशी अंजलीने मला फोन करुन हॉटेलमध्ये बोलावलं होतं. मी गेलो नाही तर एका मुलाला पाठवून मला बोलावलं. तिथे गेल्यानंतर अंजली आणि निधी बिअर पित होत्या. त्यानंतर त्यांच्यामध्ये भांडण सुरु झालं. ते भांडण पैश्यावरुन होतं. निधी अंजलीकडे आपले पैसे मागत होती. त्यांच्यात धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या दरम्यान अंजली निघून गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com