दिल्लीतील प्रीत विहारमध्ये तरुणाची गोळ्या घालून हत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

दिल्लीतील व्ही3एस मॉलबाहेर प्रीत विहार परिसरात आज (शुक्रवार) पहाटे एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील व्ही3एस मॉलबाहेर प्रीत विहार परिसरात आज (शुक्रवार) पहाटे एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल सुरी (वय 29) हा त्याच्या मोटारीने मित्रासोबत जात होता. दरम्यान आज पहाटे प्रीत विहार परिसरात जेवण घेण्यासाठी त्याचा मित्र मोटारीतून खाली उतरला. त्यानंतर काही वेळातच रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारीत बसलेल्या विशालवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. साधारण पहाटे दोन वाजता ही घटना घडली. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा प्रीत विहार पोलिस तपास करत आहेत.

Web Title: delhi man shot dead outside mall in preet vihar