दिल्लीत प्लॅस्टिकच्या कारखान्याला आग; एक ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

राजधानी दिल्लीतील नरेला औद्योगिक परिसरातील एका प्लॅस्टिकच्या कारखान्याला मोठी आग लागली असून त्यात एक जण मृत्युमुखी पडला आहे. तर अन्य काही जण जखमी झाले आहेत. मदतकार्य सुरू आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील नरेला औद्योगिक परिसरातील एका प्लॅस्टिकच्या कारखान्याला मोठी आग लागली असून त्यात एक जण मृत्युमुखी पडला आहे. तर अन्य काही जण जखमी झाले आहेत. मदतकार्य सुरू आहे.

आज (शनिवार) सकाळी नरेला औद्योगिक परिसरातील एका प्लॅस्टिकच्या कारखान्याला आग लागली. "आम्ही आत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आग थांबली आहे. मात्र मदतकार्य अद्यापही सुरु आहे', अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना दिली. आग एवढी भयानक होती की तिच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 32 बंबांनी प्रयत्न केले. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पथकही हजर झाले आहे. आगीत जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या आगीत अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश मिळाल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

Web Title: Delhi: Massive fire in Narela industrial area, one killed

टॅग्स