रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Minister Slaps Young Man रस्त्याच्या कामांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मंत्र्यांना लोकांनी कामाच्या दर्जावरून प्रश्न विचारले. त्यावेळी झालेल्या वादातून मंत्र्यांनी व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणालाच कानशिलात लगावल्याचा दावा करण्यात येतोय.
Minister Parvesh Verma Allegedly Slaps Man

Minister Parvesh Verma Allegedly Slaps Man

Esakal

Updated on: 

दिल्ली सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी एका तरुणाला कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पश्चिम दिल्लीतील तिलक नगरमध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी मंत्री महोदय गेले होते. यावेळी रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून आम आदमी पक्षाचे आमदार जरनैल सिंह आणि मंत्र्यांमध्ये वाद झाला. याचदरम्यान एका तरुणाला कानशिलात मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com