

Rajasthan Bus Fire Leaves 7 Dead, 22 Injured
Esakal
दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर राजस्थानच्या दौसा इथं मध्यरात्री अडीचच्या सुमारास भीषण अपघात झाला. हरिद्वारहून इंदौरच्या दिशेनं निघालेल्या प्रवाशांच्या बसची ट्रकला धडक बसली. यानंतर लागलेल्या आगीत होरपळून ७ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले आहेत. बसमधून एकूण ३७ प्रवाशी प्रवास करत होते असं सांगण्यात येत आहे.