Mumbai High Court
esakal
नवी दिल्ली : राजधानीत बॉम्ब धमक्यांचा सिलसिला थांबण्याचं नाव घेत नाहीये. आज (शुक्रवार) दिल्ली उच्च न्यायालयाला (Delhi High Court) ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. या मेलमध्ये न्यायालयाच्या आवारात, विशेषतः न्यायाधीशांच्या कक्षात आणि इतर भागांत स्फोटके ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच दुपारच्या नमाजानंतर स्फोट होईल, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, दिल्लीपाठोपाठ आता मुंबई हायकोर्टलही (Mumbai High Court) बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे आजची सुनावणी स्थगित केली आहे.