सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप 120, भाजप 115 तर काँग्रेसनं घेतली फक्त 3 जागांवर आघाडी! Delhi MCD Election Result | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Municipal Election

निवडणुकीत काँग्रेसची अवस्था वाईट असून दोन्ही पक्षांच्या तुलनेत मोठ्या फरकानं पक्ष मागं असून तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Delhi MCD Election Result : सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप 120, भाजप 115 तर काँग्रेसनं घेतली फक्त 3 जागांवर आघाडी!

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीच्या (Delhi Municipal Election) मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पक्ष आघाडीवर आहे. परंतु, एक्झिट पोलच्या शक्यतांनुसार 'आप'ला एकतर्फी विजय मिळताना दिसत नाहीये. इथं भाजपनं दुसऱ्या क्रमांकावर आघाडी घेतली आहे.

तर, इथं काँग्रेसची अवस्था वाईट असून दोन्ही पक्षांच्या तुलनेत मोठ्या फरकानं पक्ष मागं असून तिसऱ्या क्रमांकावर आहे. एमसीडी निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये जवळपास सर्व सर्वेक्षण संस्थांनी आम आदमी पक्षाला वरचढ ठरवत विजयाचा दावा केला आहे. दिल्ली महानगरपालिकेत (एमसीडी) 250 प्रभाग आहेत आणि 1349 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद आहे. मतमोजणीसाठी 42 केंद्रं तयार करण्यात आली आहेत.

हेही वाचा: Maharashtra Government : कुठे दगडफेक तर कुठे घोषणाबाजी, सरकारनं बसेसबाबत घेतला मोठा निर्णय; पाहा 10 अपडेट्स

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आपनं आघाडी घेतलीय. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये आप 120, भाजप 115 आणि काँग्रेसनं फक्त 3 जागांवर आघाडी घेतली आहे.