Delhi Name Change Demand : आता थेट दिल्लीच्याही नावात बदल होणार? ; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना 'या' व्यक्तीने पाठवलंय पत्र!

Delhi Name Change Demand Letter received CM Rekha Gupta : जाणून घ्या, नेमकं कुणाकडून आणि काय बदल करण्याची करण्यात आली आहे मागणी?
Former Union Minister Vijay Goel meets Delhi Chief Minister Rekha Gupta, urging the government to officially change the English name of Delhi.

Former Union Minister Vijay Goel meets Delhi Chief Minister Rekha Gupta, urging the government to officially change the English name of Delhi.

esakal

Updated on

Vijay Goel demands to change Delhi’s English name : माजी केंद्रीयमंत्री विजय गोयल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना पत्र लिहून राष्ट्रीय राजधानीचे इंग्रजी नाव ‘Delhi’ हे बदलून ‘Dilli’ करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, दिल्लीचे मूळ नाव संस्कृत शब्द ‘धिल्लिका’ मधून आले, जे कालांतराने बदलून ‘दिल्लि’ झाले. ऐतिहासिक ग्रंथ, फारसी इतिहास आणि यात्रींच्या उल्लेखातही नावाचा उच्चार नेहमीच ‘दिल्लि’ राहिलेला आहे.

गोयल यांच्या मते, ‘Delhi’ या शब्द एक ब्रिटीश प्रभाव आहे. जो मूळ उच्चार आणि सांस्कृतिक ओळखीशी विसंगत आहे. त्यांनी सांगितले की, स्थानिक लोक शतकानुशतके ‘दिल्लि’ असाच उच्चार करत आले आहेत.

तसेच, कविता, लोकगीते आणि साहित्यांमध्येही हेच नाव वापरले गेले आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नईच्या प्रमाणेच नाव बदलण्यात आर्थिक किंवा तांत्रिक अडचणी आता मोठा अडथळा नाही. डिजिटल युगात हे सोपे आहे. असंही गोयल यांनी म्हटलं आहे.

Former Union Minister Vijay Goel meets Delhi Chief Minister Rekha Gupta, urging the government to officially change the English name of Delhi.
Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

१ नोव्हेबर रोजी लाँच होणाऱ्या नवीन सरकारी लोगोमध्ये ‘Dilli’ समाविष्ट करण्याचे सूचवण्यात आले आहे. गोयल यांचे मत आहे की, ‘’यामुळे राजधानीची सांस्कृतिक ओळख आणि जनतेचे भावनिक संबंध आणखी मजबूत होतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील स्थानिक नावे स्वीकारल्याने सांस्कृतिक आदर वाढतो, जसं की बीजिंग, मॉस्को इत्यादी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com