
Delhi Suffocates After Diwali, AQI Above 400 Prompts Emergency Response
Esakal
दिवाळीत दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता घसरली असून प्रदुषणात खूप वाढ झालीय. हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० च्या वर पोहोचला आहे. यानंतर CAQMने ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आलीय. वातावरण आणि हवेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर १२ कलमी अॅक्शन प्लॅन लागू करण्यात आलाय. एनसीआरमध्ये GRAP स्तर दोन अंतर्गत पावलं उचलली जात आहेत. आयोगाने प्रदुषण नियंत्रण बोर्ड आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीला कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.