
Delhi Patel Nagar newborn murder case 2025 : मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर गर्भवती राहिलेल्या २६ वर्षीय तरुणीने बाळाला जन्म दिल्यानंतर नवजात बाळाचा गळा दाबूबन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उडकीस आला आहे. गुरुवारी दिल्लीतील पटेलनगर भागात ही घटना घडली. संबंधित महिला ही उत्तर प्रदेशच्या रायबरेलीतील रहिवासी असून ती दिल्लीत लोकांच्या घरी घरकाम करते. याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.