Drugs : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2 अफगाणींकडून 1200 कोटींचं तब्बल 325 किलो ड्रग्ज जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Methamphetamine Drug and 10 kg Heroin

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं दोन अफगाण नागरिकांना अटक केली आहे.

Drugs : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2 अफगाणींकडून 1200 कोटींचं तब्बल 325 किलो ड्रग्ज जप्त

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलनं दोन अफगाण नागरिकांना (Afghan Citizen) अटक केली असून त्यांच्याकडून 312.5 किलो (3 क्विंटल) मेथाम्फेटामाइन (Methamphetamine Drugs) आणि 10 किलो हेरॉईन जप्त केलंय.

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) या ड्रग्जची (Drugs) किंमत 1200 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही अफगाण नागरिकांची ओळख मुस्तफा आणि रहीमुल्लाह अशी झाली असून ते नार्को टेरर सिंडिकेट अंतर्गत मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा पुरवठा करत होते.

हेही वाचा: 'लव्ह जिहाद'च्या कचाट्यात कुणी सापडलं असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क करा : नवनीत राणा

सुरुवातीला त्यांच्याकडून अल्प प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. मात्र, नंतर चौकशी केली असता त्यांच्याकडं अमली पदार्थांचा एवढा मोठा साठा आढळून आला. याबाबतचा अधिक तपास दिल्ली पोलिस करत आहेत.

हेही वाचा: Delhi : भाजपला रोखण्यासाठी नितीश कुमारांची मोठी खेळी; राहुल गांधींनंतर येचुरींची घेतली भेट

Web Title: Delhi Police Arrested Two Afghan Nationals With 312 Kgs Of Methamphetamine Drug And 10 Kg Of Heroin

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..