Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 'त्या' विधानामुळे अडचणीत वाढ; दिल्ली पोलीसांची निवासस्थानी धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

demand for apology from ruling party for statements made diversion Adani case politics rahul gandhi

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 'त्या' विधानामुळे अडचणीत वाढ; दिल्ली पोलीसांची निवासस्थानी धडक

दिल्ली पोलिसांचे पथक काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले आहेत. नोटीसच्या संदर्भात दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी सागर प्रीत हुड्डा त्यांच्या घरी पोहोचल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुलने दिलेल्या वक्तव्याबाबत दिल्ली पोलिसांनी राहुलला यापूर्वी नोटीस पाठवली होती. त्याला पोलिसांनी नोटीस पाठवून 'लैंगिक छळ' पीडितांची माहिती मागवली होती.

एका पीडितेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी राहुल गांधी यांनी विधान केलं होतं. या प्रकरणी राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस जारी केली होती. त्यांना या पीडितेची माहिती देण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र राहुल गांधी यांनी या नोटिशीला काहीच उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे दिल्ली पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आहे. स्पेशल सीपी (कायदा आणि सुव्यवस्था ) सागर प्रीत हुड्डा हे राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले आहेत.

आम्ही राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहे. राहुल गांधी यांनी 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये एक विधान केलं होतं. यात्रे दरम्यान अनेक महिला मला भेटल्या. त्यांनी त्यांच्यावर बलात्कार झाल्यचं सागितलं. राहुल गांधी यांच्याकडून याचीच माहिती घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण त्या महिलांना न्याय मिळावा हा आमचा हेतू आहे, असं सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितलं आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा श्रीनगरला पोहोचली होती. तेव्हा राहुल गांधी यांनी येथील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धक्कादायक विधाने केली. महिलांचं लैंगिक शोषण होत आहे. आमच्याकडे तशा तक्रारी आल्या आहेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. दिल्ली पोलिसांनी या विधानाची गंभीर दखल घेत राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. आम्हाला त्या महिलांची नावे द्या. त्यांची माहिती द्या. म्हणजे आम्हाला कारवाई करता येईल, असं पोलिसांनी या नोटिशीत म्हटलं होतं.

टॅग्स :Rahul GandhiDelhi Police