'मुस्लिम पंतप्रधान झाला तर..; यती नरसिंहानंदांचं चिथावणीखोर वक्तव्य, गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yati Narsinghanand

नरसिंहानंद यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

'मुस्लिम पंतप्रधान झाला तर..; यती नरसिंहानंदांचं चिथावणीखोर वक्तव्य

दिल्लीतील हिंदू महापंचायतमध्ये (Hindu Mahapanchayat) प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी पोलिसांनी यती नरसिंहानंद (Yati Narsinghanand) यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. यती नरसिंहानंद यांच्यासह दिल्ली पोलिसांनी सुरेश चौहान यांच्यावरही गुन्हा दाखल केलाय.

हिंदू महापंचायत कार्यक्रमादरम्यान दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) विविध कलमान्वये आयोजकांवर गुन्हा दाखल केलाय. आपल्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत आलेले यती नरसिंहानंद यांनी रविवारी दिल्लीच्या मुखर्जी नगरमध्ये हिंदू महासभेचं आयोजन केलं होतं. यती नरसिंहानंद म्हणाले, 2029, 2034 किंवा 2039 या वर्षाच्या कालावधीत देशाचा मुस्लिम पंतप्रधान असेल आणि एकदा का मुस्लिम पंतप्रधान (Muslim Prime Minister) झाला, तर पुढच्या 20 वर्षात 50 टक्के हिंदू धर्मांतर करतील. शिवाय, 40 टक्के हत्या होतील आणि उरलेले 10 टक्के हिंदू निर्वासित शिबिरात किंवा दुसऱ्या देशात जातील, असं त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलंय.

Hindu Mahapanchayat

Hindu Mahapanchayat

हेही वाचा: श्रीलंकेत पंतप्रधानांच्या मुलासह 26 मंत्र्यांचा राजीनामा

नरसिंहानंद यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये नरसिंहानंद हे हिंदूंना त्यांचं अस्तित्व वाचवण्यासाठी शस्त्र उचलण्याचा सल्ला देत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओत नरसिंहानंद हे हिंदूंचं भविष्य असेल, असंही म्हणताना ते दिसत आहेत. या सगळ्यातून सुटका हवी असेल, तर माणूस व्हा आणि शस्त्र हाती घ्या, असं आवाहन त्यांनी हिंदूंना केलंय. दरम्यान, कार्यक्रमाचं कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या दिल्लीतील काही पत्रकारांसोबत गैरवर्तन केल्याचंही वृत्त आहे.

Web Title: Delhi Police Fir Against Yati Narsinghanand For Inflammatory Speech In Hindu Mahapanchayat Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..