दिल्ली पोलिसांनी जप्त केली 49 लाखांची रोकड

पीटीआय
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी काल दिल्ली-हरियाना सीमेवर एका व्यक्तीकडून 49 लाख रुपयांची रोकड जप्त केली. याबाबत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव दिनेश आहे. पोलिसांनी सांगितले, की एक व्यक्ती हरियानाच्या दिशेने पैसे घेऊन गाडीने निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली-हरियाना सीमेवर संबंधित कारला थांबविण्यात आले. त्यानंतर तिची तपासणी केल्यानंतर त्यात 49 लाख 96 हजार रुपये सापडले. दिनेश म्हणाला, की आपण पितमपूर येथे राहणाऱ्या अनुज गुप्ता या प्रॉपर्टी डीलरकडे चालक असून, हे त्या डीलरचे पैसे आहेत.

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी काल दिल्ली-हरियाना सीमेवर एका व्यक्तीकडून 49 लाख रुपयांची रोकड जप्त केली. याबाबत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव दिनेश आहे. पोलिसांनी सांगितले, की एक व्यक्ती हरियानाच्या दिशेने पैसे घेऊन गाडीने निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली-हरियाना सीमेवर संबंधित कारला थांबविण्यात आले. त्यानंतर तिची तपासणी केल्यानंतर त्यात 49 लाख 96 हजार रुपये सापडले. दिनेश म्हणाला, की आपण पितमपूर येथे राहणाऱ्या अनुज गुप्ता या प्रॉपर्टी डीलरकडे चालक असून, हे त्या डीलरचे पैसे आहेत. अनुजने हे पैसे नोटा बदलण्यासाठी दिले होते, की अन्य कोणाला देण्यासाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. हे पैसे जप्त करण्यात आले असून, प्राप्तिकर विभागाला याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अद्याप सुरू आहे.

गोरखपूर येथील रहिवासी नझर ए आलम याला 18 नोव्हेंबर रोजी 96 लाखांच्या रोकडसह अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे एक हजार रुपयांच्या बाद केलेल्या नोटा सापडल्या होत्या. त्याच्याकडील बॅगेत 96 लाख रुपयांची रोकड सापडली होती; मात्र याबाबत तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नव्हता. दरम्यान, पश्‍चिम बंगालमध्ये कंपनी असणाऱ्या एकाकडून 17 नोव्हेंबर रोजी 500 आणि एक हजारच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.

Web Title: Delhi police have seized 49 lakh in cash