

Delhi Blast Vehicle
ESakal
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर दिल्ली पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि इतर तपास संस्था सक्रिय झाल्या आहेत. या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. दिल्ली पोलीस आता स्फोट झालेल्या वाहनाच्या भागांवरून वाहनाचा नंबर ओळखण्याचे काम करत आहेत. त्यानंतरच त्याच्या मूळ मालकाची ओळख पटेल.