
Rahul Gandhi News : दिल्ली पोलिसांची राहुल गांधींना 'त्या' विधानांवरून नोटीस; भारत जोडो यात्रेत…
दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान ज्या पीडितांचा उल्लेख केला होता. आता त्या पीडिताची माहिती देण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सांगितले होते की, लैंगिक छळाच्या प्रकरणात संरक्षणाची अपेक्षा ठेवून पिडीतांनी त्यांची भेट घेतली होती. तसेच या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी महिलांच्या छेडछाडीबाबत इतरही अनेक विधाने केली होती. या विधानांबाबत दिल्ली पोलिसांनी आता राहुल गांधींना काही प्रश्नांच्या स्वरूपात नोटीस पाठवून उत्तरे मागितली आहेत.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये विधान केले होते की, मी एका बलात्कार पीडितेला भेटलो होतो, त्यावेळी मी त्या मुलीला आपण पोलिसांना बोलावूयात का असे विचारले, तेव्हा तिने माझी बदनामी होईल म्हणत फोन करण्यास नकार दिला, असे सांगितले होते.