सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरुर पुन्हा अडचणीत; दिल्ली पोलिसांची हायकोर्टात धाव : Shashi Tharoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunanda-Pushkar_Shashi Tharoor

Shashi Tharoor : सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरुर पुन्हा अडचणीत; दिल्ली पोलिसांची हायकोर्टात धाव

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर प्रकरणी काँग्रेसचे खासदार शशी थरुर हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सत्र न्यायालयानं १८ ऑगस्ट २०२१ त्यांच्या सुटकेवर दिल्ली पोलिसांनी आक्षेप घेतला असून याविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. (Delhi Police moves HC against Shashi Tharoor discharge in Sunanda Pushkar death case)

हेही वाचा: Maharashtra Karnataka Row: कर्नाटकनं महाराष्ट्राला पुन्हा डिवचलं! जतच्या दुष्काळी भागात सोडलं पाणी

सन २०१४ मध्ये शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह एका आलिशान हॉटेलमध्ये आढळून आला होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी थरुर यांच्याविरोधात पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आणि क्रूरता केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. पण सत्र न्यायालयानं १८ ऑगस्ट २०२१ रोजी थरुर यांना या गुन्ह्यातून निर्देष मुक्त केलं होतं.

हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

दरम्यान, पण आता पंधरा महिन्यांनंतर दिल्ली पोलिसांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, न्या. दिनेश कुमार शर्मा यांनी शशी थरुरांना दिल्ली पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवरुन नोटीस बजावली आहे. पोलिसांनी पुनर्विचार दाखल करण्यात ‘दिरंगाईबद्दल क्षमा’ मागितली आहे. त्यानंतर न्यायालयाकडू आता या प्रकरणावर 7 फेब्रुवारी 2023 रोजी सुनावणी होणार आहे.