esakal | दिल्ली दहशतवाद्यांच्या रडारवर! पोलिस कमिश्नरनी घेतली खबरदारीची बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्ली दहशतवाद्यांच्या रडारवर! पोलिस कमिश्नरनी घेतली खबरदारीची बैठक

येणाऱ्या सणासुदींच्या काळात राजधानी दिल्लीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.

दिल्ली दहशतवाद्यांच्या रडारवर! पोलिस कमिश्नरनी घेतली खबरदारीची बैठक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : येणाऱ्या सणासुदींच्या काळात राजधानी दिल्लीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस कमिश्नर राकेश अस्थाना यांनी काल शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. येणाऱ्या सणासुदीच्या काळात राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी कारवायांची शक्यता लक्षात घेता खबरदारीच्या उपाय योजनांसंबधीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजि त करण्यात आली होती.

हेही वाचा: दसऱ्यानंतरच रणधुमाळी; BJP च्या उदयनराजेंचा 'निर्णय' NCP च्या कोर्टात

स्थानिकांची मदत घेऊन दहशतवादी कारवाया पार पडताना दिसतात, तेंव्हा ही स्थानिकांची मदत मिळू नये, यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत त्यांनी उपस्थितांना कल्पना दिली की, येणाऱ्या सण-समारंभांच्या काळात दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: विजा, मेघगर्जनेसह दोन दिवस पावसाचा अंदाज

मात्र, स्थानिकांची मदत घेतल्याशिवाय याप्रकारचे हल्ले हे शक्य नसतात. तेंव्हा स्थानिक गुन्हेगार आणि गँगस्टर्स अशा हल्ल्यांमागे मदतनीस म्हणून उभे राहतात, असं त्यांनी स्पष्ट केलं. सायबरकॅफे, केमिकल शॉप्स, पार्कींग स्पेस तसेच स्क्रॅप आणि कार डीलर्स यांची ठिकाणे सुव्यवस्थितपणे तपासली गेली पाहिजेत. पेट्रोल पंप आणि पेट्रोल टँकर्स या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती आहे, असंही त्यांनी म्हटलं. दिल्लीत रहायला आलेले भाडेकरू आणि कामगारांच्या पडताळणीसाठीची मोहीम सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

loading image
go to top