Delhi Pollution: बांधकामांवरील निर्बंध मागे; शाळा सुरु होण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

delhi Pollution

Delhi Pollution: बांधकामांवरील निर्बंध मागे; शाळा सुरु होण्याची शक्यता

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : दिल्लीमधील प्रदूषणाच्या समस्येने रौद्ररुप धारण केले आहे. इतकं की लोकांच्या जीवितेची काळजी घेत त्याठिकाणी अनेक गोष्टींवर बंदी आणावी लागली आहे. राजधानी दिल्लीत काल रात्रीपासून वेगाने वारे वाहू लागल्याने प्रदूषणाची पातळी किंचित कमी झाली आहे. केजरीवाल सरकारने आता बांधकामांवरील व अन्य काही व्यवहारांवरील बंदी उठविण्याचा निर्णय आज घेतला. शाळा- महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या २४ नोव्हेंबरला (बुधवार) होणाऱ्या बैठकीत सरकार निर्णय घेईल, असे सांगण्यात आले.

हेही वाचा: 'त्रिपुरा'बाबत PM मोदींची घेणार भेट; दिल्ली दौऱ्यापूर्वी ममतांचा एल्गार

शाळा- महाविद्यालये गेले आठवडाभर बंद

दरम्यान दिल्लीतील प्रदूषणाची पातळी किंचित सुधारली तरी हवेतील विषारी वायूकणांचे प्रमाण तेवढेच गंभीर आहे. वायू गुणवत्ता निर्देशांक अजूनही ३०० ते ४०० च्या दरम्यान, म्हणजे गंभीर-अतिशय गंभीर या श्रेणीतच असल्याचे दिसून आले. हवेची गुणवत्ता किंचित सुधारताच केजरीवाल सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. शाळा- महाविद्यालये गेले आठवडाभर बंद असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे.

हेही वाचा: शनिवारी लग्न अन् सोमवारी केली आत्महत्या, नवरदेवाचे टोकाचे पाऊल

हवेचा गुणवत्ता स्तर असाच उंचावत राहिल्यास २४ तारखेच्या बैठकीत आणखी काही गोष्टी पुन्हा सुरू केल्या जाऊ शकतात. दिल्लीच्या सीमांवर रोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यातील सीएनजीवर चालणाऱ्या ट्रकना पुन्हा राजधानीत प्रवेश देण्याबाबत येत्या येत्या २४ तारखेला होईल असे मंत्री गोपाल राय यांनी नमूद केले.

loading image
go to top