

Thick smog blankets Delhi as authorities enforce work from home, vehicle restrictions, and PUC checks to combat hazardous air pollution levels.
esakal
Summary
आपत्कालीन व अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना (आरोग्य, अग्निशमन, स्वच्छता) सूट देण्यात आली आहे.
PUC प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना पेट्रोल देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या ट्रकला दिल्लीमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीची हवा विषारी बनली असून गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील AQI गंभीर पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी दिल्ली सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत, ज्याचा दिल्लीकरांवर परिणाम होणार आहे सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालयांसाठी वर्क फ्रॉम होम, विशिष्ट प्रकारच्या वाहनांवर बंदी आणि PUC निवार्य यासह कठोर निर्बंध आजपासून लागू आहेत.