'दिल्ली प्रदूषणात पंजाबमध्ये जाळल्या जाणाऱ्या पेंढ्याचा वाटा'; राजधानी पुन्हा 'काळवंडली'

Delhi Pollution
Delhi Pollution

दिल्ली : दिल्लीतील प्रदुषणाच्या समस्येने आता पुन्हा डोकं वर काढलं आहे. ही समस्या दरवर्षी डोकं वर काढते. कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशच बंद केला होता. त्यामुळे देशातील सर्व उद्योगधंदे आणि वाहतुक बंद होती. याचा परिणाम म्हणून देशातील प्रदुषणाची पातळी अत्यंत खाली गेली होती. ज्याचा सकारात्मक परिणाम म्हणून प्राणीदेखील रस्त्यावर आल्याचे चित्र दिसत होतं. मात्र आता टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया पार पाडली जात असतानाच राजधानी दिल्लीतील प्रदुषणाच्या समस्येने आपलं डोकं वर काढलं आहे. 

या पार्श्वभूमीवर केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आता काही हालचाली करताना दिसत आहे. हिवाळा ऋतूत ही समस्या अधिक तीव्र होते, असे निरिक्षण आहे. त्यामुळे, येणाऱ्या हिवाळा ऋतूच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने आजपासून दिल्ली-एनसीआरमध्ये निरीक्षण करण्यासाठी 50 टिम्स तैनात केल्या आहेत. तसेच मंडळाने म्हटलंय की, आम्ही राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाला कळवलं आहे की त्यांनी आमच्याद्वारे दिल्या गेलेल्या विविध सुचनांचे पालन करण्यासाठी फिल्डवर या टीम्सना तैनात करावे. 

राजधानी दिल्लीमध्ये लोकांना आता प्रदुषणाचा परिणाम दिसून येण्यास सुरवात झाली आहे. सकाळी राष्ट्रपती भवनाजवळ सायकलिंग करण्यास निघणाऱ्या विशाल यांनी सांगितलं की, दिल्लीत आता इतके प्रदुषण वाढलंय की आता सूर्यदेखील दिसत नाहीये. पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकरी आपल्या शेतात जाळत असलेल्या पेंढ्यांमुळेही दिल्ली भागातील प्रदुषणात वाढ होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे, हा पेंढा जाळण्यावर सरकारने बंदी घातली पाहीजे, अशी मागणीही त्यांनी केली. 

याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बातचित केली असता ते म्हणले की, दिल्लीमध्ये हिवाळ्यात प्रदुषणाची स्थिती अत्यंत गंभीर बनते. पंजाबमध्ये गेल्या वर्षीहून अधिक पेंढा यावर्षी जाळला जात आहे. केंद्र सरकारने एवढ्या मशीन्स दिल्या आहेत. पंजाब सरकारने याबाबत लक्ष द्यायला हवं की तिथल्या शेतकऱ्यांकडून अतिप्रमणात पेंढा न जाळला जावा. प्रदुषणास कारणीभूत घटकांमध्ये शेतकऱ्यांकडून जाळला जाणारा पेंढ्याची भागीदारी 4 टक्के इतकी असल्याची माहिती त्यांनी दिली. 

कोरोना हा श्वसनासंबधींचा रोग आहे. त्यातच दिल्लीतील वाढते वायू प्रदुषण हे कोरोनाच्या गांभीर्याला आणखी तीव्र करु शकतात, असा अभ्यासकांचा दावा आहे. त्यामुळे गरजेशिवाय घराबाहेर न  पडण्याचा सल्ला दिल्लीकरांना देण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com