

Massive protest in Delhi against Election Commission; Former BJP MLA's daughter in police custody
Sakal
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) राजधानी दिल्लीत पुकारलेल्या आंदोलनामुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जंतरमंतरवरील या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी हाय अलर्ट जारी करत ५०० हून अधिक आंदोलकांची धरपकड केली. विशेष म्हणजे, या आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशातील भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांची कन्या यशस्वी राजे सिंह यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी पोलीस ठाण्यातून शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.