दिल्लीत मेट्रो स्टेशनवर, 'देश के गद्दारोंको गोली मारो', घोषणा; पोलिसांकडून गंभीर दखल

टीम ई-सकाळ
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

सकाळी पावणे 11च्या सुमारास ही घटना घडली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओत पांढरे शर्ट घातलेले काही जण ही घोषणाबाजी करत होते.

नवी दिल्ली : दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत 'देश के गद्दारोंको गोली मारो' या घोषणेमुळं केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर अडचणीत आले होते. या घोषणेवरून निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपही झाले. आता ही घोषणा सार्वजनिक ठिकाणी देऊ लागले आहेत. त्यामुळं दिल्लीसाठी ही चिंतेची बाब बनली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

काय घडले?
नवी दिल्लीतील New Delhi राजीव चौक Rajiv Chowk मेट्रो स्टेशनवर काही तरुणही घोषणा  बाजी करत होते. ईशान्य दिल्लीतील दंगल नुकतीच आटोक्यात आली आहे. तेथील जनजीवन अजूनही सामान्य नाही. त्यातच मेट्रो स्टेशवर अशी घोषणाबाजी सुरू झाल्यामुळं चिंता व्यक्त होऊ लागली आहे. या घोषणाबाजीची गंभीर दखल सोशल मीडियानं घेतली. सोशल मीडियावर घोषणा देणाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरलही झाला. सकाळी पावणे 11च्या सुमारास ही घटना घडली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ पांढरे शर्ट घातलेले काही जण ही घोषणाबाजी करत होते. मेट्रोच्या सुरक्षा रक्षकांनी आणि स्टाफने तातडीने हा प्रकार थांबवला आणि घोषणाबाजी करणाऱ्यांना मेट्रो रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिली. विशेष म्हणजे, दिल्लीतील मेट्रो स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा घोषणाबाजी करायला बंदी आहे. त्यामुळं आता दिल्ली मेट्रो रेल्वे पोलिस या नियमानुसार करवाई करतील, असे दिल्ली मेट्रो व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. घोषणा बाजी करणाऱ्यांनी 'देश के गद्दारोंको गोली मारो' ही घोषणा तर दिलीच. पण, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थही घोषणा दिल्या. 

आणखी वाचा - कन्हैय्याकुमारवर चालणार देशद्रोहाचा खटला

'या प्रकाराला प्रोत्साहन नको'
दरम्यान, बॉलिवूड डायरेक्टर ओनीर यांने हा व्हिडिओ शेअर करत, हा काही आदर्श असू शकत नाही, असं म्हटलंय. राजीव चौक स्टेशनवरील या प्रकारावर त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. फिल्ममेकर विपीन शर्मानेही ट्विट करताना या घोषणाबाजीवर नाराजी व्यक्त केलीय. एका विशिष्ट हेतूनं ही घोषणाबाजी करण्यात आल्याचं विपीननं म्हटलंय. या प्रकाराला प्रोत्साहन दिलं तर, हा ट्रेंड होईल, अशी भीतीही विपीननं व्यक्त केलीय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi rajiv chowk metro station goli maro video viral