कन्हैया कुमार अडचणीत; देशद्रोहाचा खटला चालणार 

disloyalty case against former jnusu leader kanhaiya kumar
disloyalty case against former jnusu leader kanhaiya kumar

नवी दिल्ली New Delhi : जेएनयूएसयूचा JNU माजी अध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमार kanhaiya kumar आणि इतरांवर देशद्रोहाचा खटला चालविण्यासाठी दिल्ली सरकारने शुक्रवारी दिल्ली पोलिसांना परवानगी दिली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देण्यात आलेल्या कथित देशविरोधी घोषणांच्या प्रकरणी हा खटला चलवण्यात येणार आहे.

काय घडले होते?
संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेचा निषेध करण्यासाठी बोलावलेल्या कार्यक्रमात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कॅम्पसमध्ये (जेएनयू) देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. यानंतर कन्हैया कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. या घटनेनंतर दिल्ली पोलिस गुन्हे शाखेने दाखल केलेल्या १ हजार २०० पानांच्या आरोपपत्रात या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून कन्हैया कुमार, उमर खालिद, अनिर्बन भट्टाचार्य आणि सात काश्मिरी विद्यार्थ्यांसह इतर १० विद्यार्थ्यांची नावे आहेत. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने एक फेब्रुवारी रोजी दिल्ली गृहसचिवांना पत्र लिहून जेएनयूएसयूचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांचा समावेश असलेल्या जेएनयू देशद्रोह प्रकरणात मंजुरी देण्याची प्रक्रिया वेगवान करण्याची विनंती केली होती. यावर दिल्ली सरकारने आज (ता.२८) पोलिसांना या प्रकरणी कन्हैया कुमार आणि इतरांवर देशद्रोहाचा खटला चालविण्यासाठी दिल्ली सरकारने शुक्रवारी दिल्ली पोलिसांना परवानगी दिली.

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काय खरे काय खोटे?
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या की नाही, याविषयी कायमच संभ्रम आहे. कन्हैय्या कुमार आणि त्याच्या साथीदारांनी या आरोपांचा सुरुवातीपासून इन्कार केलाय. तसेच याप्रकरणात दिल्ली पोलिसांकडून चालढकल करण्यात आली. कन्हैय्यावर गुन्हा दाखल करण्यातही दिरंगाई झाली. त्यामुळं नेमका अपराध घडला की नाही यावर आजही प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. आता देशद्रोहाचा खटला चालवल्यानंतर मात्र, यातील सत्य उघड होण्याची अपेक्षा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com