स्थळ - सोनिया गांधींचे निवासस्थान, भेट - उदयनराजे आणि नाना पटोलेंची

टीम ई सकाळ
Wednesday, 10 February 2021

दिल्लीत उदयनराजेंनी ज्यांच्याकडून लोकसभेला पराभव पत्करावा त्या श्रीनिवास पाटील यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्यानं नवी चर्चा सुरु आहे. 

नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशातील नेते सध्या दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातील खासदारही या अधिवेशनात सहभागी झाले असून वेगवेगळ्या पक्षातील नेते एकमेकांच्या भेटीही घेत आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा होत आहे ती साताऱ्याचे भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांची. दिल्लीत उदयनराजेंनी ज्यांच्याकडून लोकसभेला पराभव पत्करावा त्या श्रीनिवास पाटील यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्यानं नवी चर्चा सुरु आहे. 

महाराष्ट्रात काँग्रेसनं नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले हे दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. तेव्हा उदयनराजे यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर नाना पटोले यांची भेट घेतल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे. या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना जस्ट वेट अँड वॉच असं म्हटल्यानं नव्या चर्चेला उधाण आलं आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे. या नियुक्तीनंतर नाना पटोले ही दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्यासाठी गेले आहेत. यावेळी दिल्लीत भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी पटोले यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीचे फोटो आता व्हायरल होत आहेत. 

हे वाचा - सीता, रावणाच्या देशातील पेट्रोल-डिझेलचे दर रामाच्या भारतापेक्षा कमी कसे?, मोदी सरकारनं दिलं हे उत्तर..

उदयनराजे दिल्लीत सोनिया गांधींच्या निवासस्थानासमोरून जात होते. त्यावेळी नाना पटोले दिसताच त्यांनी गाडी थांबवून पटोलेंची भेट घेतली. उदयनराजेंनी नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं असं म्हटलं आहे. तर पटोले यांनी मात्र गोंधळात टाकणारं विधान केलं आहे. काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी इतर पक्षातल्या नेत्यांना पक्षात घेण्याचं काम सुरु आहे. जस्ट वेट अँड वॉच.. पुढे आणखी आश्चर्यकारक धक्के देऊ असं उदयनराजेंच्या भेटीनंतर पटोले यांनी म्हटलं आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi rajya sabha mp udayanraje meet nana patole