दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी १००० कोरोनाबाधित, PM मोदी घेणार बैठक | Delhi Corona Updates And Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी १००० कोरोनाबाधित, PM मोदी घेणार बैठक

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्या एक हजारांपुढे गेली आहे. त्याबरोबरच सक्रिय रुग्णसंख्या दीड महिन्यांमध्ये सर्वाधिक झाली आहे. कोरोनामुळे २४ तासांमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाचे १४४ नवीन प्रकरणे समोर आली असून दोघांचा मृत्यू झाला. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) धोका वाढत चालला आहे. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) कोरोनाचे १०८३ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून ८१२ जण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे, की कोरोनाचे वाढते प्रकरणे पाहाता लोकांना सतर्क आणि कोविड नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे. (Delhi Records Above One Thousand New Corona Cases, PM Narendra Modi Takes Meeting)

हेही वाचा: पोलिस ठाण्यातून रवी राणा अन् नवनीत राणा यांची तुरुंगात रवानगी

दीड महिन्यात सर्वाधिक सक्रिय प्रकरणे

दिल्लीत कोरोनाचे सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ३ हजार ९७५ वर पोहोचली आहे. यापूर्वी १२ फेब्रूवारी रोजी कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण होते. १२ फेब्रूवारी रोजी कोरोनाचे सक्रिय रुग्णांची संख्या ४३३१ होती. दिल्लीत संक्रमणाचा दर ४.४८ टक्के झाला आहे.

महाराष्ट्रातही कोरोना

महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे १४४ नवीन प्रकरणे आणि दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संक्रमित रुग्णांची संख्या ७८ लाख ७६ हजार ८४१ झाली असून मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८३४ झाली. दोन्ही मृत पुण्यातील आहे. दुसरीकडे कोरोनातून ९५ रुग्ण बरे झाले. महाराष्ट्रात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे.

हेही वाचा: हनुमान चालीसाची भीती का वाटते? मोहित कंबोज यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल

पंतप्रधान मोदी घेणार बैठक

देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येत्या २७ एप्रिल रोजी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. यात कोरोना नियमांबाबत कठोर निर्णय होण्याची शक्यता आहे. ही बैठक व्हिडिओ काॅन्फ्ररन्सच्या माध्यमातून होईल.

Web Title: Delhi Records Above One Thousand New Corona Cases Pm Narendra Modi Takes Meeting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra Modicovid19delhi
go to top