
हनुमान चालीसाची भीती का वाटते? मोहित कंबोज यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल
मुंबई : अगोदरही एफआयआर हे खोट्या आणि फसव्या असतात. माझी एफआयआर नोंदविल्यानंतर त्यावर मी सही केली. पोलिस अचानक आम्हाला सांगतात की कलमे आम्हाला बदलायची आहेत. हाच प्रकार रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याबाबत झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे, अशी स्थिती कधीही घडलेली नाही, अशी टीका भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीवर केली आहे. ते आज रविवारी (ता.२४) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एफआयआर नंतर देशद्रोहाचे कलम लावले जाते. मुंबई (Mumbai) पोलिस कळसूत्री बाहुलीप्रमाणे वागत आहे. हे बंद व्हायला हवे. लोकांच्या जीवाला धोका आहे. त्याच्याबरोबर खेळणे बंद करावे, असा इशारा कंबोज यांनी दिला. (Mohit Kamboj Attack On Chief Minister Uddhav Thackeray For Hanuman Chalisa)
हेही वाचा: राज्यात तणाव! PM मोदींच्या कार्यक्रमाला CM ठाकरे मारणार दांडी
सहा महिन्यांपासून मी किती वेळा पोलिस ठाण्यात माझ्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली. दररोज मला सोशल मीडियावरुन धमक्या येतात. माझ्यावर लोकांनी हल्लाही केला. अद्यापही पोलिसांनी मला सुरक्षा दिलेली नाही. त्यानंतरही गृहमंत्र्यांनी स्वतःहून दखल घ्यायला हवे होते. मात्र त्यांनी तसे केलेले नाही. माझ्यावर हल्ला झाला. आम्ही सांगितल्याप्रमाणे तक्रार दाखल करणार की, तुमच्या इच्छेप्रमाणे .. माझ्यावर हल्ला झाल्यावर गृहमंत्री फोन करत नाहीत. त्यांचा बॅलन्स काय संपला काय ? मुख्यमंत्री स्वतःच कायद्याचे पालन करित नाहीत. १४४ कायदा लागू असताना त्यांनी स्वतः भेट दिली. त्यांनी कायद्याच्या राज्याचे चिंधडे उडवले. त्यांना माहित आहे की त्यांच्या एका खिशात पोलिस आणि दुसऱ्यात त्यांची यंत्रणा आहे. आज ते जे ताकद दाखवत आहे, ना भारतीय जनता पक्षावर मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर त्यांचेच लोक हल्ला करतात. त्यांचे आमदार, खासदार त्यानंतर वेगवेगळे स्पष्टीकरण देतात. आणि सामनात त्यांची पत्नी संपादक आहेत.
हेही वाचा: उद्धवा,अजब तुझे सरकार ! आचार्य भोसलेंचा राणा दाम्पत्यावरील कारवाईनंतर टीका
त्या लिहितात की प्रसाद दिले. अनिल परब म्हणतात सोडणार नाही. संजय राऊत म्हणतात, पाहिले जाईल. त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल. ही काय भाषा आहे. ते काय लोकांना भडकवत आहेत . हल्ला करण्याचं बोलल जात आहे. जीवे मारण्याची धमकी देत आहेत. अद्यापही मुंबई पोलिसांना स्वतःहून दखल घेतलेली नाही. त्यांच्या सर्वांच्या वक्तव्यांची छाननी व्हायला हवी. जे-जे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांनी दिले. त्याची छाननी व्हायला हवी. कशा प्रकारे षडयंत्र चालू आहे. येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला होऊ शकतो. माॅब लिचिंग करण्याची तयारी बंगालनंतर महाराष्ट्राचे सरकार करायला जात आहे. उद्धव ठाकरे हे जनाब ठाकरे साहेब झाले आहेत. मग ते काय सांप्रदायिक झाले आहेत का ? खुर्चीच्या लालसेपायी त्यांनी स्वतःची विचारधारा तोडली. त्यांना हनुमान चालीसाची भीती का वाटते. त्यांना हनुमानच्या नावाने भीती का वाटते. ते हिंदु आहेत. प्रत्येक हिंदुंसाठी मातोश्री हे मंदिर आहे. तुम्ही विचारधारा का बदलली, असा सवाल कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
Web Title: Mohit Kamboj Attack On Chief Minister Uddhav Thackeray For Hanuman Chalisa
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..