

दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या एनआयएला एक मोठे यश मिळाले आहे. एनआयएने या प्रकरणात पहिली अटक केली आहे. आमिर रशीद अली नावाच्या व्यक्तीला दिल्लीतून अटक केली आहे. स्फोटात वापरलेली आय२० कार आमिरच्या नावावर नोंदवण्यात आली होती असे वृत्त आहे.