Delhi explosion vehicle details
esakal
Whose car was involved in Delhi explosion: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात चालत्या कारमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर दिल्ली पोलीस तसेच एनआयएची टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी तपास सुरु केला आहे.
या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा दशतवादी हल्ला आहे का? या अँगलनेही तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या गाडीत हा स्फोट झाला, ती गाडी नेमकी कुणीची याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.