Delhi Blast
esakal
सोमवारी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटाचा तपास आता दहशतवादी हल्ला म्हणून केला जाणार आहे. एआयएने त्यादृष्टीने कारवाई सुरु केली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी आहेत. प्राथमिक तपासानंतर दिल्ली स्फोटाचे तार फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडण्यात आलं आहेत. डॉ. उमर हा दहशतवादी गाडी चालवत होता, अशी माहिती आता समोर आली आहे.