

Red Fort Blast
esakal
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेटजवळ सोमवारी एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेत आतापर्यंत ९ जण ठार झाले आहेत, तर २० जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे विमा पॉलिसीमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा समावेश असतो का, असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ९/११ हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय पुनर्विमा कंपन्यांनी दहशतवाद कव्हर मागे घेतले. त्यानंतर एप्रिल २००२ मध्ये भारतातील सर्व बिगर-जीवन विमा कंपन्यांनी इंडियन मार्केट टेररिझम रिस्क इन्शुरन्स पूल (IMTRIP) स्थापन केला.