esakal | दिल्ली हिंसाचाराचा तपास हास्यास्पद; HC ने पोलिसांना ठोठावला दंड
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्ली हिंसाचाराचा तपास हास्यास्पद; HC ने पोलिसांना ठोठावला दंड

गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दिल्ली हिंसाचाराचा तपास हास्यास्पद; HC ने पोलिसांना ठोठावला दंड

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. उच्च न्यायालयने पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितलं होतं. एका व्यक्तीने आपल्याला दंगलीवेळी डोळ्याला गोळी लागल्याचं म्हटलं होतं. यामध्ये दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले होते.

याप्रकरणी उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना कठोर शब्दांत सुनावलं आहे. उच्च न्यायालयाने म्हटलं की, पोलिसांनी वेगळ्या एफआयआरमधून आरोपींना पळवाट तयार करून दिली असं दिसतं. यात वाईट गोष्ट अशी की पोलिस अधिकारी तपासावेळी त्यांचे कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरले.

हेही वाचा: स्पुटनिक-कोविशिल्डची 'मिक्स अँड मॅच' लस येणार?; RDIF चे संकेत

सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलनावेळी दिल्लीत गेल्या वर्षी 24 फेब्रुवारीला हिंसाचार उसळला होता. यामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी 751 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली उच्च न्यायालायने भजनपुरा पोलिसांना दंड केला आहे. हा दंड एसएचओ आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठोठावला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद यादव यांनी आदेश पोलिस आयुक्तांना पाठवला आहे. त्यांनी म्हटलं की, या प्रकरणी पोलिसांचा तपास हा हास्यास्पद होता. न्यायालायने पोलिस आयुक्तांना या प्रकरणी योग्य ती पावले उचलण्यास सांगितलं आहे.

loading image