esakal | स्पुटनिक-कोविशिल्डची 'मिक्स अँड मॅच' लस येणार?; RDIF चे संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

sputnik-covishield

स्पुटनिक-कोविशिल्डची 'मिक्स अँड मॅच' लस येणार?; RDIF चे संकेत

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडकडून (RDIF) लवकरच स्पुटनिक व्ही आणि अॅस्ट्राझेनेका या दोन लसींचे 'मिक्स अँड मॅच' लसीचे निष्कर्ष लवकरच जाहीर करणार आहे. येत्या जुलै अखेरपर्यंत हे निष्कर्ष समोर येतील, अशी माहिती RDIFचे सीईओ किरिल द्मित्रिएव यांनी दिली. तसेच या चाचण्यांमधून लसीची उच्च कार्यक्षमता दिसून येईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, भारतात स्पुटनिक आणि कोविशिल्ड या दोन लसींची मिक्स अँड मॅच लसीबाबतची त्यांनी संकेत दिले आहेत. (Sputnik V AstraZeneca mix & match vaccine dose expected by the end of July aau85)

हेही वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात मोठी वाढ

द्मित्रिएव म्हणाले, "आम्हाला आशा आहे की, स्पुटनिक व्ही आणि अॅस्ट्राझेनिका 'मिक्स अँड मॅच' लसीचे जुलै अखेरपर्यंत निष्कर्ष समोर येतील. सुरुवातीपासूनच स्पुटनिकनं याबाबत उदार दृष्टीकोन बाळगला आहे. त्यामुळे आम्ही आता भारतात कोविशिल्डसोबत 'मिक्स अँड मॅच' लस बनवण्यासाठी तयार आहोत. आमचा विश्वास आहे की, याचेही चांगले निष्कर्ष समोर येतील. कोविशिल्ड ही अॅस्ट्राझेनिकाचीच लस आहे त्यामुळे याच्या निष्कर्षांमध्ये उच्च कार्यक्षमता दिसून येईल. त्यामुळे भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया स्पुटनिक व्ही आणि त्याचबरोबर 'मिक्स अॅड मॅच' लस देखील तयार करेल याची आम्हाला आशा आहे. ही खरी भागीदारी असेल."

हेही वाचा: गर्दी वाढल्यास निर्बंध कठोर करा, केंद्राचे राज्यांना नवे आदेश

भारतात कोविशिल्डसाठी 'मिक्स अँड मॅच' लस बनवण्याचा आम्ही विचार करत आहोत. दरम्यान, RDIF आणि SII यांच्यामध्ये भारतात स्पुटनिक व्ही लस तयार करण्याचा सामंजस्य करार झाला आहे. सप्टेंबरमध्ये सीरमच्या कारखान्यात स्पुटनिक व्हीच्या लसीची पहिली बॅच तयार होण्याची आशा आहे. दोन्ही कंपन्यांकडून भारतात वर्षभरात ३०० मिलियन लसींचे डोस तयार करण्याचे उद्देश ठेवला आहे, असंही द्मित्रिएव यांनी म्हटलं आहे.

loading image