मोदी सरकार उलथून टाकण्यासाठी दिल्ली दंगल; चार्जशीटमध्ये दावा

NARENDRA MODI DELHI RIOTS.jpg
NARENDRA MODI DELHI RIOTS.jpg

नवी दिल्ली- फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलीमागचा मुख्य हेतू मोदी सरकारला उलथून टाकण्याचा होता. दिल्ली पोलिसांनी एका प्रकरणात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये हा दावा करण्यात आला आहे. चार्जशीटमध्ये म्हणण्यात आलं आहे की, ज्या दिवशी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल घोषीत झाले, त्याच दिवशी मुख्य षडयंत्रकाऱ्यांनी आपली योजना आखली होती. दिल्ली पोलिसांनी म्हटलंय की, आरोपींमध्ये हिंसेप्रति असलेले आकर्षण सरळपणे दिसून येत आहे. 

नेपाळ नरमला; भारताच्या दबावानंतर वादग्रस्त नकाशा असलेल्या पुस्तकावर बंदी

कठोर अशा यूएपीए कायद्याअंतर्गत एकूण १५ लोकांवर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी उदाहरण देऊन उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये झालेली घटना दहशतवादी कृत्य असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

पोलिसांनी पुरावा म्हणून वक्तव्य, कॉल डिटेल्स रिकॉर्ड्स, पैसे ट्रान्सफर आणि वॉट्सअॅप चॅटिंग मिळवले आहेत. चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं आहे की, आरोपी अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान आपली कारवाई पार पाडणार होते. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) परत घेण्यासाठी भारत सरकारला घुडघ्यावर यायला लावणे, अशी षडयंत्रकाऱ्यांची योजना होती. चार्जशीटमध्ये शेवटी असं लिहिण्यात आलंय की, सर्व षडयंत्रकाऱ्यांचा मुख्य हेतू सत्तेवर असणाऱ्या सरकारला योजनाबद्ध पद्धतीने धार्मिक हिंसेच्या माध्यमातून उलधून टाकण्याचा होता.

पोलिसांनी स्वराज इंडियाचे नेता योगेंद्र यादव, चित्रपट निर्माता राहुल रॉय आणि सबा दीवान, पिंजरा तोड संघटनेच्या कलिता आणि नरवाल, सीपीआईचे एन्नी राजा, एमकेएसएसच्या रक्षिता स्वामी, कार्यकर्ते हर्ष मंदर आणि अंजली भारद्वाज यांच्यामध्ये झालेली चॅटिंग पुरावा म्हणून सादर केली आहे. 

सावधान! OTP शिवाय खात्यातून काढले जातातय पैसे; तुम्ही अशी घ्या काळजी

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर, दहशतवादी कृत्य ते असते ज्यात हिंसेच्या माध्यमातून आपली मागणी मान्य करुन घेण्यासाठी सरकारला भाग पाडले जाते. चार्जशीटमध्ये भारताच्या संदर्भात दहशतवादी कृत्याची व्याख्या देण्यात आली आहे. शस्त्र, पेट्रोल बॉम्ब यांचा दंगलीमध्ये वापर झाला, ज्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे आणि अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. हिंसेचा हेतू केंद्र सरकारला सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) मागे घेण्यास भाग पाडणे, हा होता. हे सरळसरळ दहशतवादी कृत्याच्या व्याख्येमध्ये बसते, असं चार्चशीटमध्ये म्हणण्यात आलं आहे. 

(EDITED BY- KARTIK PUJARI)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com