
Delhi Classroom Scam: दिल्लीतील कथित दारुवरील अबकारी कर घोटाळ्यामुळं माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि कॅबनेट मंत्री सत्येंद्रनाथ जैन यांना ईडीनं तुरुंगात धाडलं होतं. पण आता पुन्हा एकदा मनिष सिसोदिया आणि सत्येंद्रनाथ जैन यांना ईडीनं समन्स पाठवलं आहे. यावेळी ईडीला 2000 कोटींचा नवा घोटाळा आढळला असून हा 'क्लासरुम घोटाळा' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.