
MNS-Shivsena Alliance: मनसे-शिवसेना यांच्या युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून केवळ चर्चांची गुऱ्हाळ सुरु आहेत. प्रत्यक्षात युतीसाठी काहीही हालचाल होताना दिसत नाही. यापार्श्वभूमीवर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी संजय राऊत आणि ठाकरेसेनेच्या इतर नेत्यांना डिवचलं आहे. अचानक त्यांना युतीचा उत्साह कसा काय संचारलाय? असा सवालही त्यांनी केला. तसंच युती-आघाडीपेक्षा महाराष्ट्राचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.