पोलीस स्टेशन की अलिशान हॉटेल? देशातील सर्वोत्तम स्टेशन चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadar Bazar Police Station
पोलीस स्टेशन की अलिशान हॉटेल? देशातील सर्वोत्तम स्टेशन चर्चेत

पोलीस स्टेशन की अलिशान हॉटेल? देशातील सर्वोत्तम स्टेशन चर्चेत

sakal_logo
By
सुधीर काकडे

पोलीस स्टेशन म्हटलं की अनेकदा आपल्यासमोर नकारात्मक चित्र निर्माण होतं. त्यात पोलिसांकडून बऱ्याचवेळा चांगली वागणूक दिल्या जात नाहीत, त्यामुळे अनेकजण पोलीस स्टेशनची पायरीच चढायला नको असं म्हणतात. मात्र दिल्लीतील सदर बाजार पोलीस स्टेशन (Sadar Bazar Police Station) या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. त्यामुळेच या पोलीस स्टेशनला भारतातील सर्वोत्तम पोलीस स्टेशन म्हणून निवडण्यात आलं आहे.

दिल्लीतील 160 वर्षे जुने सदर बाजार पोलीस स्टेशन हे देशातील सर्वोत्तम तीन पोलीस ठाण्यांपैकी एक म्हणून निवडले गेले आहे. गृहमंत्री अमित शहा या पोलीस स्टेशनच्या प्रमुख अधिकाऱ्याला पुरस्कार देणार आहेत. १८६१ साली दिल्लीतील सर्व जुन्या पोलीस स्टेशनमध्ये सदर बाजार पोलीस ठाणे सुरू करण्यात आले होते. नुकतेच गृह मंत्रालयाच्या पथकाने या पोलीस स्टेशनची पाहणी केली असून यावर्षी देशातील सर्वोत्तम तीन पोलीस ठाण्यांमध्ये या पोलीस ठाण्याची निवड करण्यात आली आहे.

Sadar Bazar

Sadar Bazar

हेही वाचा: 'दुसरा गाल पुढे करण्यासाठी...' कंगनाला गांधीजींचे पणतू तुषार गांधींचे उत्तर

या पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करताच हे पोलीस स्टेशन सामान्य पोलीस स्टेशनपेक्षा वेगळे असल्याचे लक्षात येते. पोलीस स्थानकात आलेल्या लोकांना बसण्यासाठी बाहेर खास व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामध्ये दिव्यांग रुग्णांसाठी व्हीलचेअर आहे. संपूर्ण पोलिस स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येते. विशेष मुलांना खेळण्यासाठी हा किड्स झोन आहे. पोलीस ठाण्याच्या आतील दृश्य हे हेरिटेज हॉटेलपेक्षा कमी नाही. पोलिस ठाण्याच्या प्रांगणात बॅडमिंटन कोर्ट असून तेथे जिम सुद्धा आहे.

हेही वाचा: 'स्किन टू स्किन' स्पर्शाशिवायही POCSO कायदा लागू होणार - SC

सदर बाजारचे एसएचओ कन्हैयालाल यादव सांगतात की, या पोलीस स्टेशनमध्ये ३१ डिसेंबर १८६१ रोजी पहिली तक्रार डल्लू माली नावाच्या व्यक्तीने केली होती. त्यांचं ७ रुपयांचं मोहरीचं तेल चोरीला गेल्याचा आरोप होता. तेव्हापासून ही इमारत दिल्ली पोलिसांनी स्वच्छ आणि सुंदररित्या जपली आहे.

loading image
go to top