
मुलींना छेडताना अटक केलेल्या व्यक्तीचा मोबाईल पाहून पोलिसही हैराण
नवी दिल्ली : दिल्लीतील एका शाळेत मुलींची छेडछाड करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. उत्तरपूर्व दिल्लीतील भजनपुरा भागातील ईस्ट एमडी स्कूलमध्ये ही घटना घडली असून ताब्यात घेण्यात आलेल्या ४० वर्षीय व्यक्तीचा मोबाईल तपासल्यावर पोलिसही हैराण झाले आहेत.
(Delhi Crime News)
दरम्यान सदर ४० वर्षीय व्यक्ती एमडी शाळेतील मुलींची छेड काढताना आढळल्यावर त्याला पोलिसांना ताब्यात घेतले आणि त्याचा मोबाईल तपासला तेव्हा हैराण करणारे व्हिडीओ समोर आले आहेत. त्याच्या फोनमध्ये पॉर्न व्हिडीओ पोलिसांना मिळाले असून तो आपल्या परिसरात राहणाऱ्या महिलांची आणि मुलींची छेड काढत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या फोनमध्ये सापडलेल्या माहितीच्या आधारे तो पॉर्न व्हिडीओच्या आहारी गेला असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे.
हेही वाचा: केजरीवालांना मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्याला घरात घुसून अटक
अटक करण्यात आलेला व्यक्ती हा पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करत होता पण त्याला व्यसनाची सवय असल्यामुळे त्याला कामावरुन काढण्यात आलं होतं. जेव्हा पोलिसांनी त्याला छेडछाडीच्या प्रकरणावरुन ताब्यात घेतलं तेव्हाही तो नशेत असल्याचं पोलिसांना आढळलं. त्यानंतर चौकशीत त्याच्या फोनमध्ये अश्लील व्हिडीओ आढळले आहेत. दरम्यान त्याबद्दल चौकशी करताना शाळेतील मुलींनी माहिती विचारली असता त्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्केच तयार करुन त्याची ओळख पटल्यावर अटक केली आहे.
हेही वाचा: शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या माथेफिरूला अटक
चौकशीतून तो आपल्या परिसरातील महिला आणि मुलींची छेड काढत असतो असं समोर आलं आहे. या घटनेची दखल घेत बाल हक्क संरक्षण आयोगाने (DCPCR) पूर्व दिल्ली शिक्षण संचालक आणि भजनपुरा पोलिस स्टेशनला नोटीस पाठवली आहे. DCPCR ने या घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे.
Web Title: Delhi School Ragging Criminal Arrest Mobile Porn Video
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..