
केजरीवालांना मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्याला घरात घुसून अटक
चंदीगड : दिल्लीतील भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते तजिंदरपाल सिंग बग्गा यांना पोलिसांनी त्यांच्या पश्चिम दिल्लीतील निवासस्थानावरुन अटक केली आहे. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना धमकी दिल्याच्या कारणावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
(Arvind Kejriwal News)
हेही वाचा: शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या माथेफिरूला अटक
आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी काश्मीर फाईल्स हा चित्रपट मोफत दाखवण्याची गरज नाही, यूट्युबवर टाका सगळे लोकं फ्री बघतील असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्यांना विरोध केला होता. दरम्यान अटक करण्यात आलेल्या तजिंदरपाल सिंग यांनी त्यांना जगू देणार नाही अशी धमकी दिली होती. त्यानंतर पंजाब पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना अटक केली आहे. त्यामुळे विरोधकांनी आपवर आणि भगवंत माण सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
हेही वाचा: राज ठाकरेंवर गुन्हा; वसंत मोरे तिरुपती बालाजीला रवाना
दरम्यान आपच्या अरविंद केजरीवाल यांनी काश्मीर फाईल्सवर केलेल्या वक्तव्याचा विरोध करत ते काश्मिरी पंडितांच्या विरोधात आहेत असं म्हटलं होतं. त्यानंतर बग्गा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पंजाब पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. अखेरीस त्यांना पश्चिम दिल्लीतून त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपा आणि आपमध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे.
बग्गा यांना पंजाबच्या जवळपास ५० पोलिसांनी घरात घुसून अटक केली आहे असा दावा भाजपाच्या काही नेत्यांनी केला आहे. तसेच आपवर भाजपा नेत्यांनी या प्रकरणामुळे टीका केली असून केजरीवाल यांच्याबद्दल टीका आणि अपशब्द वापरल्याप्रकरणी आपकडून भाजपावर टीका केली जात आहे.
Web Title: Tajinderpal Bagga Arrest Arvind Kejriwal Murder Threat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..