

Delhi Building Collapse
esakal
नवी दिल्लीतील सीमापुरी भागात बुधवारी एक चार मजली इमारत अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली. काही क्षणांतच संपूर्ण इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी रस्त्यावर कोसळली. या दुर्दैवी दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका १२ वर्षीय मुलीसह, चार महिन्यांची गरोदर असलेली २१ वर्षीय गुलफसा आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.