Delhi Kanjhawala Case : तरुणीला फरफटत नेल्याप्रकरणात सातव्या आरोपीचं समर्पण; Video पाहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Kanjhawala Case

Delhi Kanjhawala Case : तरुणीला फरफटत नेल्याप्रकरणी सातव्या आरोपीचं समर्पण; Video पाहा

नवी दिल्लीः नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका २० वर्षीय तरुणीला कारने १३ किलोमीटर फरफटत नेलं. यामध्ये तरुणीच मृत्यू झाला. तिच्या अंगावरचे सगळे कपडे फाटले होते. या प्रकरणी आता सातव्या आरोपीने पोलिसांसमोर समर्पण केलं.

या प्रकरणामध्ये आता मृत अंजलीच्या मैत्रिणीने माहिती दिली आहे. पोलिसांनी या तरुणीचा जबाब नोंदवला आहे. ही मैत्रीण सीसीटीव्ही फुटेजमध्ये हॉटेलबाहेर दिसली होती. हीच तरुणी स्कुटीवर अंजलीसोबत होती. मृत अंजलीची मैत्रीण निधीने सांगितलं की, संपूर्ण चूक ही कार चालकाची होती. कारने धडक दिल्यानंतर अंजली घाबरली होती. धडकेनंतर ती कारच्या बाजूला पडली.

ज्या कारने पीडित मृत तरुणीला फरफटत नेलं, ती कार काही तासांपूर्वीच आरोपींनी एका मित्राकडून घेतली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुराव्यांवरुन टाईमलाईन बनवण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी आरोपींना घटनास्थळी घेऊन जावं लागले. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर आरोपींवर कलम वाढवली जाणार आहेत.

हेही वाचा: Delhi Girl Accident : अपघातानंतर अंजली घरी गेली होती; मैत्रिणीच्या जबाबाने खळबळ

ही घटना १ जानेवारी रोजी पहाटे २ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनास्थळी पोलिसांना एक स्कुटी आणि बुट मिळाला होता. ही स्कुटी रेखा नावाच्या महिलेच्या नावावर होती. तिने ही स्कुटी पाच वर्षांपूर्वीच विकलेली होती.

या प्रकरणातला सातवा आरोपी अंकूश याने आज दिल्लीतल्या सुलतानपूर पोलिस ठाण्यामध्ये समर्पण केलं. एएनआयने पोलिसांसमोर सरेंडर करण्यापूर्वीचा व्हीडिओ ट्विट केला आहे.