Video : दिल्ली पोलिसांकडून 'एक्सपायर्ड' अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

Delhi Student Protest : अश्रुधुराच्या नळकांड्या मुदतबाह्य असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Delhi Student Protest

Delhi Student Protest

esakal

Updated on

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत कॉक्रोज जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. परवा विद्यार्थ्यांनी 'चलो संसद'चा नारा देत संसदेकडे मोर्चा काढला. मात्र, मोर्चा रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलकांना अडवताना पोलिसांनी लाठीचार्ज केला.

इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. मात्र, या अश्रुधुराच्या नळकांड्या मुदतबाह्य असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com