Delhi Student Protest
esakal
दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन पुन्हा एकदा चिघळले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संसद भवन मार्ग आणि टॉलस्टॉय मार्ग परिसरात आंदोलक विद्यार्थी व पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तर काही ठिकाणी लाठीचार्जही करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.