Delhi Tractor Parade - लाल किल्ल्यावर फडकावले झेंडे; VIDEO

टीम ई सकाळ
Tuesday, 26 January 2021

काही आंदोलक दिल्लीतील लाल किल्ल्यावर दाखल झाले आहेत. लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलकांनी झेंडेही फडकावले आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीत शेतकरी आंदोलक आक्रमक झाले आहेत. प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. दरम्यान, काही आंदोलक दिल्लीतील लाल किल्ल्यावर दाखल झाले आहेत. लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलकांनी झेंडेही फडकावले आहेत.

लाल किल्ल्यावरही आंदोलक शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. सिंघु बॉर्डरवरचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. ट्रॅक्टर ठरलेल्या मार्गावरून जावेत यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा शांततेत आंदोलन होईल असं म्हटलं आहे. तरीही आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र आहे. काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. 

हे वाचा - दिल्लीत शेतकरी आक्रमक झाल्यानंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया; आंदोलकांना आवाहन

हिंसाचार हा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही. कोणालाही दुखापत झाली तरी नुकसान आपल्याच देशाचं होईल असं म्हणत राहुल गांधी यांनी देशहितासाठी कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी केली.

हे वाचा - Tractor Parade:संतप्त शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक; पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कोणतीही हिंसा होणरा नाही आणि यापुढचे आंदोलन शांततेत करतील असंही ते म्हणाले. तसंच पोलिसांनी रिंग रोडवरून रॅलीसाठी परवानगी मागितली होती. पोलिसांनी संख्या बघून परवानगी द्यायला हवी होती असंही टिकैत यांनी सांगितलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi tractor parade red fort farmers protestars flag video