10 रुपयांत जेवण आणि बरंच काही; 'डियू'त आश्वासनांची खैरात

वृत्तसंस्था
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

तसेच अभाविपने सर्व महाविद्यालयात सॅनिटरी नॅपकिन्ससाठी वेंडींग मशिन बसविण्याचे आश्वासन दिले. आम आदमी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेने सर्व महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसवणार, सर्व महाविद्यालयात पोलिस बूथ उभारणार, शिक्षणाचे व्यावसायिकरण थांबवणार तसेच महाविद्यालयातील असभ्यवर्तन करणाऱ्यांवर लगाम घालण्याचे आश्वासन दिले आहे.  

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या विविध पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज (ता. 12) मतदान होत आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी अनेक आश्वासने दिली आहेत. त्यापैकी एनएसयूआयने विद्यापीठात 10 रूपयांना जेवण मिळेल असे आश्वासन दिले आहे. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थी संघटनेला मिळणाऱ्या अनुदानातून पन्नास टक्के पैसे हे महिला व सामाजिक न्याय तसेच क्रीडा क्षेत्रावर खर्च करण्याचे आश्वासन दिले आहे.

तसेच अभाविपने सर्व महाविद्यालयात सॅनिटरी नॅपकिन्ससाठी वेंडींग मशिन बसविण्याचे आश्वासन दिले. आम आदमी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेने सर्व महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसवणार, सर्व महाविद्यालयात पोलिस बूथ उभारणार, शिक्षणाचे व्यावसायिकरण थांबवणार तसेच महाविद्यालयातील असभ्यवर्तन करणाऱ्यांवर लगाम घालण्याचे आश्वासन दिले आहे.    

या निवडणूकीसाठी विविध पक्षांचे व संघटनांचे 23 उमेदवार रिंगणात आहेत. 52 ठिकाणी होणाऱ्या या मतदानासाठी 700 इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनची योजना करण्यात आली आहे. दिल्ली विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक या मतदानावर देखरेख व नियंत्रण करतील. 13 सप्टेंबरला या निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.

Web Title: delhi university elections voting today made various promises by student unions