esakal | Delhi: व्हिडिओ वाजपेयींचा निशाणा मात्र भाजपवर
sakal

बोलून बातमी शोधा

वरुण गांधी

व्हिडिओ वाजपेयींचा निशाणा मात्र भाजपवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील पिलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी यांनी केंद्राचे कृषी कायदे व लखीमपूर हिंसाचारावरून पुन्हा स्वपक्षावर निशाणा साधला आहे. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका जुन्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी या कायद्यांचा दुरुपयोग शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी होत असल्याचे म्हटले आहे.

वरुण हे भाजपबाहेर जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशाची निवडणूक होईपर्यंत भाजप नेतृत्व आपल्याला हात लावण्याची शक्यता कमी आहे हे ओळखून त्यांनी लखीमपूरच्या निमित्ताने स्वपक्षीय नेतृत्वावर एकामागोमाग एक टीकास्त्र सोडणे चालू ठेवले आहे.

हेही वाचा: प्रा. राजन शिंदे खून प्रकरण : ‘एसआयटी’चे पथक देऊळगाव राजाला रवाना

काय म्हणाले होते वाजपेयी ?

वाजपेयी या व्हिडिओत म्हणतात की, आम्ही शेतकऱ्यांच्या मुद्याचा राजकीय वापर करू इच्छित नाही. मात्र मी सरकारला इशारा देतो की दडपशाहीचे प्रयत्न सोडून द्या. शेतकऱ्यांना धमकाविण्याचे प्रयत्न करू नका. शेतकरी घाबरणारा नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या योग्य मागण्यांना पूर्ण पाठिंबा देतो. सरकार जर दडपशाही करून कायदेशीर मार्गाने सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळाने दडपण्याचा प्रयत्न करणार असेल तर शेतकऱ्यांच्या आंदोलनात भाजपही उडी घेईल. आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा भिडवून आंदोलनात सरकार विरुद्ध उभे राहू.

loading image
go to top