
दिल्ली हिंसाचार : आरोपींवर NSA अंतर्गत गुन्हा दाखल
नवी दिल्ली : दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत जहांगीपुरीत उसळलेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्या 5 आरोपींवर दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिल्ली पोलिसांना दंगलखोरांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर आज 5 दंगलखोरांवर NSA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Delhi Violence Accused Charged Under National Security Act)
हेही वाचा: Dual Degree : UGC ने केलं सर्व शंकाचे निरसन; वाचा कशी मिळणार डिग्री
अन्सार, सलीम, इमाम शेख उर्फ सोनू, दिलशाद आणि अहिर अशी NSA अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी हिंसाचार प्रकरणातील आणखी एक आरोपी गुल्ली यालाही अटक केली आहे. हिंसाचारात सहभागी असलेल्यांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी अन्सार हा भंगार विक्रेता म्हणून काम करतो, पण त्याच्यावर अवैध सट्टा चालवल्याबद्दल चार गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा: चारधाम यात्रेत फक्त हिंदूंना प्रवेश? धामींचे मोठे वक्तव्य
जहांगीरपूर दंगलीच्या दिवशी संध्याकाळी निळ्या कुर्त्यामध्ये पोलिसांवर गोळीबार करताना व्हायरल झालेला सोनू शेख याचीही अटकेनंतर चौकशी सुरू आहे. पोलीस त्याचा जुन्या गुन्हेगारी रेकॉर्डचा शोध घेत असून त्याची चौकशी करत आहेत. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून, त्याच्याकडून अत्याधुनिक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. सोनूच्या आधी अटक झालेला त्याचा भाऊ सलीम चिकना हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, शस्त्रास्त्र कायदा असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
Web Title: Delhi Violence 5 Accused Charged Under Stringent National Security Act
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..