

Delhi Yamuna Pollution Controversy
Esakal
सध्या देशभरात छठपूजेचा उत्साह दिसून येत आहे. मात्र यातच आता यमुना नदीच्या प्रदूषणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दिल्लीत यमुना नदीच्या पाण्यावर पांढरा फेस असून त्यातच छठपूजा केली जात असल्याचे फोटो समोर आले आहेत. यावरून आम आदमी पार्टीने भाजपवर निशाणा साधला. याला प्रत्युत्तर देताना भाजपने केजरीवाल सरकारच्या काळातल्या परिस्थितीची आठवण करून दिलीय.